मोहित सूरीच्या ‘सैयारा’ने केला विक्रम, जागतिक बॉक्स ऑफिसवर पार केला ५०० कोटींचा टप्पा

नवी दिल्ली, ५ ऑगस्ट: दिग्दर्शक मोहित सूरी यांच्या रोमँटिक ड्रामाने ‘सैयारा’ने जगभरात ५०० कोटी रुपयांचा गल्ला जमवून भारतीय चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक यश मिळवले आहे. या चित्रपटात अहान पांड्या आणि अनीत पड्ढा या नवोदित कलाकारांची प्रमुख भूमिका आहे.

यशराज फिल्म्स या निर्मितीसंस्थेने मंगळवारी अधिकृत निवेदनात सांगितले की, “सैयारा हा भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा प्रेमकथा चित्रपट ठरला आहे.”

यशराज फिल्म्सने निवेदनात म्हटले आहे,

सैयारामुळे मोहित सूरी यांना त्यांच्या कारकिर्दीतील पहिलं ५०० कोटींचं जागतिक ब्लॉकबस्टर यश मिळालं आहे. तसेच अहान आणि अनीत हे भारतीय सिनेमाच्या इतिहासात ५०० कोटी क्लबमध्ये पदार्पण करणारे पहिले नवोदित कलाकार ठरले आहेत. फक्त १८ दिवसांत या चित्रपटाने एकूण ५०७ कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली आहे.”

‘सैयारा’ या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. त्यातील संगीत, कथानक, आणि नव्या कलाकारांची फ्रेश केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मोहित सूरी यांची दिग्दर्शकीय शैली आणि भावनात्मक मांडणी यामुळे चित्रपटाला ही घवघवीत यश मिळालं आहे.

हा चित्रपट नवोदित कलाकारांसाठी एक प्रेरणादायक उदाहरण ठरत आहे आणि बॉक्स ऑफिसवरील यशामुळे यशराज फिल्म्सच्या यशाच्या यादीत आणखी एक नामांकित भर पडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish