जगातील पहिल्या प्लास्टिक कराराआधी ‘द लॅन्सेट’चा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू; प्लास्टिकच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचे निरीक्षण होणार

नवी दिल्ली (4 ऑगस्ट): प्लास्टिकमुळे होणाऱ्या आरोग्यविषयक परिणामांचे निरीक्षण करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय संशोधक आणि तज्ज्ञांच्या समूहाने महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. जगातील पहिल्या प्लास्टिक नियंत्रक कराराच्या अंतिम वाटाघाटीच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

या उपक्रमाचे नाव आहे – “The Lancet Countdown on Health and Plastics”. जागतिक वैद्यकीय जर्नल The Lancet मध्ये यासंबंधी ‘Health Policy’ या शीर्षकाखाली नवे धोरण प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये सध्या उपलब्ध असलेल्या संशोधनांचा आढावा घेतला असून, मायक्रोप्लास्टिक आणि प्लास्टिकमधील रसायनांचा मानवाच्या आरोग्यावर होणारा परिणाम याचा सखोल अभ्यास केला आहे.

या धोरणाचा मसुदा संयुक्त राष्ट्रसंघ स्थापन आंतरसरकारी वाटाघाटी समितीच्या (Intergovernmental Negotiating Committee – INC) सदस्यांसह अनेक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी तयार केला आहे. या समितीमार्फत जगातील पहिला ‘प्लास्टिक करार’ तयार केला जात आहे, ज्याचा उद्देश प्लास्टिकच्या वापरावर आणि त्यातील रासायनिक पदार्थांवर नियंत्रण ठेवणे आहे.

प्रकाशित धोरणात म्हटले आहे की, प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे आरोग्यावर लांब पल्याचा परिणाम होत असून, हृदयविकार, श्वसनाचे आजार, प्रजनन क्षमता कमी होणे, कर्करोग यांसारख्या अनेक गंभीर समस्यांशी याचा संबंध आहे. तरीही, अजूनही जागतिक स्तरावर याविषयी पुरेशा प्रमाणात डेटा आणि धोरणात्मक प्रतिक्रिया नाही.

‘द लॅन्सेट काउंटडाऊन ऑन हेल्थ अ‍ॅण्ड प्लास्टिक्स’ उपक्रमाचा उद्देश म्हणजे जागतिक स्तरावर प्लास्टिकमुळे होणारे आरोग्यविषयक धोके सातत्याने नोंदवणे, संशोधनाला चालना देणे आणि धोरणकर्त्यांना आवश्यक माहिती पुरवणे हा आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish