आणीबाणीचा काळ: बॅन, सेन्सॉरशिप आणि दडपशाहीतूनही सिनेउद्योगाने लढा दिला

नवी दिल्ली, २३ जून: २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली आणि त्यानंतरचे २१ महिने भारताच्या राजकीयच नव्हे तर सांस्कृतिक इतिहासातही अस्थिरतेचे ठरले. या काळात केवळ राजकीय स्वातंत्र्यच नव्हे, तर सर्जनशील अभिव्यक्तीही गंभीरपणे दबावात आली होती.

फिल्म इंडस्ट्रीवर याचा मोठा परिणाम झाला. प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांचे गाणे ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनवर बंद करण्यात आले. ‘आंधी’ सारखा राजकीय संदर्भ असलेला चित्रपट थिएटरमधून काढून टाकण्यात आला. तर ‘किस्सा कुर्सी का’ हा राजकीय व्यंगचित्रपट सेन्सॉर बोर्डने पूर्णपणे रोखला आणि त्याची फिल्मचे प्रिंटही नष्ट करण्यात आले.

या काळात काही कलाकारांनी सरकारविरोधात उघडपणे आपली भूमिका मांडली. दिग्दर्शक देव आनंद यांनी National Party of India नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन केला. याशिवाय शत्रुघ्न सिन्हा, प्राण, विजय आनंद आणि डॅनी डेंझोंगपा यांसारख्या कलाकारांनी जनता पक्षाला खुले पाठिंबा दिला.

या २१ महिन्यांत सेन्सॉरशिप अत्यंत कडक होती. पण तरीही काही चित्रपटांनी अप्रत्यक्षपणे सत्य मांडण्याचा प्रयत्न केला. या काळात सिनेउद्योगाने मोठ्या दबावाखालीही आपल्या सर्जनशीलतेचा आवाज कायम ठेवण्याचा प्रयत्न केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish