Language: English Hindi Marathi

पूर्ववैमनस्यातून टोळक्याकडून दुकानात तोडफोड.

 

पिंपरी, दि. 1 (प्रतिनिधी) – जुन्या भांडणाच्या कारनावरून पाच जणांच्या टोळक्याने किराणा दुकानात तोडफोड केली. तसेच लाकडी दांडके व लोखंडी रॉडने मारून महिलेला जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 30) सायंकाळी विजयनगर, काळेवाडी येथे घडली.

रोहित गायकवाड (वय 22), वैभव गायकवाड (वय 25, दोघेही रा. पवनानगर, काळेवाडी), सचिन गुंड (वय 21), अभय दिगंबर सोनकांबळे (वय 21, रा. काळेवाडी) व एक अनोळखी इसम यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी महिलेने रविवारी (दि. 31) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभय याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा पती व मुलासोबत पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपी फिर्यादीच्या किराणा दुकानात आले. दुकानातील काउंटर व फ्रीजचे काच, दुकानातील सामानाचे दोन लाख रुपयांचे नुकसान केले. तसेच लाकडी दांडके व लोखंडे रॉडने फिर्यादीच्या डोक्यात मारण्यासाठी आरोपी आले असता ते चुकवण्यासाठी फिर्यादी बाजूला सरकल्या. त्यावेळी फिर्यादीच्या हाताला मार लागून जखम झाली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

One thought on “पूर्ववैमनस्यातून टोळक्याकडून दुकानात तोडफोड.

  1. The next time I read a blog, Hopefully it doesnt disappoint me as much as this particular one. After all, Yes, it was my choice to read, nonetheless I actually thought you would probably have something interesting to say. All I hear is a bunch of crying about something that you could possibly fix if you were not too busy looking for attention.

Leave a Reply

Your email address will not be published.