Language: English Hindi Marathi

रिमोट कंट्रोलद्वारे तब्बल ९८ लाख रुपयांची वीजचोरी, पिंपरी चिंचवडमधील बिल्डरचा प्रताप उघड.

चिंचवड,प्रतिनिधी-बांधकामासाठी एका बिल्डरने रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने तब्बल २ लाख ४ हजार २९२ युनिटची चोरी केलीये. वीजमीटर मध्ये फेरफार करत केलेल्या चोरीची रक्कम ही ९८ लाखांच्या घरात गेलीये. महावितरणच्या भरारी पथकाने ही चोरी नुकतीच उघडकीस आणली आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रवी खिलुमन ओछानी या ग्राहकाकडील वीजमीटर आणि संचाची महावितरणच्या भरारी पथकाकडून तपासणी करण्यात आली. यामध्ये वीजमीटरमध्ये रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने फेरफार करून इमारतीच्या बांधकामासाठी गेल्या १८ महिन्यांमध्ये २ लाख ४ हजार २९२ युनिटची म्हणजे ९८ लाख ८ हजार ४४० रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले. याप्रकरणी रवी खिलुमन ओछानी विरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ मधील कलम १३५, १३६, १३७ व १३८ नुसार रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.