इंडो-पाक आशिया कप सामना: “आक्रमकतेला आवर नाही” – सूर्या आणि सलमान यांचा एकसुर

दुबई (9 सप्टेंबर): आगामी भारत-पाकिस्तान आशिया कप टी-20 सामन्याआधी दोन्ही संघांचे कर्णधार — सूर्यकुमार यादव आणि सलमान अली आगा — यांनी स्पष्ट केले की, मैदानावरची आक्रमकता थांबवण्याचे कोणतेही निर्देश नसून, ती खेळाचा भाग असल्यामुळे ती कायम राहणार आहे.

भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले:

“आक्रमकता? साहेब, ती नेहमीच असते. ती नसती, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताच आलं नसतं. आम्ही मैदानात उतरताना ती घेऊनच उतरत असतो. मी स्वतः खूप उत्साहित आहे — ‘फ्रंटफुट’वर खेळण्यासाठी.”

दुसरीकडे, पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगा यांनीही अशाच भावना व्यक्त करत म्हटले की:

“कोणत्याही प्रकारचे आदेश नाहीत. मैदानावर जसं घडेल, तसं प्रत्युत्तर दिलं जाईल.”

भारत आपला पहिला सामना 11 सप्टेंबर रोजी UAE विरुद्ध खेळणार आहे, तर सर्वांचे लक्ष लागलेल्या भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार 14 सप्टेंबर रोजी होणार आहे.

या वक्तव्यांमुळे दोन्ही संघांमधील सामन्याची तापलेली वातावरण अधिकच वाढले आहे, आणि चाहतेही आता हाय-व्होल्टेज भिडंत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish