मुंबईत ३४ वर्षीय घानाच्या नागरिकाकडून १.१५ कोटींचं कोकेन जप्त

मुंबई (१२ ऑगस्ट): अंमली पदार्थ विरोधी कारवाईदरम्यान, मुंबई पोलिसांनी ३४ वर्षीय घानाच्या नागरिकाला अटक केली असून, त्याच्याकडून २८७.८० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. या कोकेनची बाजारमूल्य सुमारे १.१५ कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.

MIDC पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनुसार, अंमली पदार्थ तस्करीविषयी विश्‍वासार्ह माहिती मिळाल्यानंतर अंधेरी (पूर्व), मरोल येथील पुलाजवळ सापळा रचण्यात आला. सोमवारी संबंधित ठिकाणी आलेल्या संशयिताला पोलिसांनी थांबवून झडती घेतली असता, त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात कोकेन सापडले.

आरोपीचे नाव हेनरी आलहोम (Henary Alhome) असे असून, तो घानाचा नागरिक असल्याचे निष्पन्न झाले आहे.

तपासादरम्यान पोलिसांनी २.७० लाख रुपये किमतीचे दोन महागडे मोबाईल फोन देखील जप्त केले आहेत.

पोलिसांनी आरोपीविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, त्याच्याकडून अंमली पदार्थ कुठून आले, व ते कुणासाठी होते याचा तपास सुरु आहे.
हे प्रकरण आंतरराष्ट्रीय ड्रग नेटवर्कशी संबंधित असण्याची शक्यता असल्याने पुढील चौकशी गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने सुरू करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish