अरुणाचलमध्ये शासकीय गृहसंकुल पुनर्विकास प्रकल्पाची सुरुवात – मुख्यमंत्री खांडूंची घोषणा

इटानगर (11 ऑगस्ट): अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी राजधानी इटानगरमधील शासकीय गृहसंकुलांच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ सोमवारी केला. या उपक्रमामुळे इटानगर एक आधुनिक आणि नीट नियोजित शहर म्हणून विकसित होईल, असे मुख्यमंत्री खांडू यांनी सांगितले.

मुख्यमंत्री खांडू यांनी बी-सेक्टर, सी-सेक्टर, पी-सेक्टर आणि नीति विहार या चार विभागांमध्ये गृहनिर्माण प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या पायाभरणीचे काम केले. यावेळी बोलताना त्यांनी 31 मे रोजी उद्घाटन झालेल्या ए-सेक्टरमधील मल्टीस्टोरी हाउसिंग कॉम्प्लेक्सचा उल्लेख केला. त्यांनी नमूद केले की, जुन्या व धोकादायक इमारती हटवून नव्या, सुरक्षित आणि सुसज्ज घरे उभारण्याचे हे त्यांच्या दृष्टीकोनातील पहिले पाऊल होते.

“हे गृहनिर्माण केवळ शासकीय कर्मचाऱ्यांसाठी नाही, तर सर्वसामान्य जनतेसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देणे हेदेखील आमचे उद्दिष्ट आहे,” असे खांडू यांनी सांगितले. त्यांनी हे ही अधोरेखित केले की, “प्रत्येक नवीन फ्लॅट भूकंपरोधक, सुरक्षित आणि सन्मानाने राहता येईल असा असला पाहिजे.”

या गृहसंकुलांच्या पुनर्विकास प्रकल्पामुळे केवळ सरकारी कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारणार नाही, तर सामान्य नागरिकांनाही परवडणाऱ्या व सुरक्षित निवासस्थानी राहण्याची संधी मिळेल. यामुळे इटानगर शहराचा शहरी चेहरामोहरा बदलण्यास मोठी मदत होईल आणि एक नियोजनबद्ध विकासाची दिशा मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish