विवेक अग्निहोत्रींच्या नव्या चित्रपटाचं नाव बदललं, ‘द दिल्ली फाइल्स’ ऐवजी आता ‘द बंगाल फाइल्स’

नवी दिल्ली : प्रसिद्ध चित्रपट निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाचं नाव बदलण्याची घोषणा केली आहे. पूर्वी ‘द दिल्ली फाइल्स: द बंगाल चैप्टर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या चित्रपटाचं नवं नाव आता ‘द बंगाल फाइल्स’ असं असणार आहे. ही माहिती त्यांनी मंगळवारी दिली.

या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर आणि पल्लवी जोशी प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत. ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘द ताशकंद फाइल्स’सारख्या वादग्रस्त आणि चर्चेत राहिलेल्या चित्रपटांनंतर अग्निहोत्री यांचा हा नवा प्रोजेक्ट देखील प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरत आहे.

‘द बंगाल फाइल्स’ ५ सप्टेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या शीर्षकात झालेल्या या बदलामुळे कथेचा मुख्य फोकस बंगालमधील ऐतिहासिक किंवा सामाजिक घडामोडींवर आधारित असल्याचे संकेत मिळतात.

विवेक अग्निहोत्री यांचे चित्रपट सामाजिक व राजकीय विषयांना भिडतात आणि वास्तवावर आधारित मांडणीसाठी ओळखले जातात. त्यामुळे ‘द बंगाल फाइल्स’ देखील एका गंभीर आणि विचारप्रवर्तक विषयाला स्पर्श करणारा असेल, अशी अपेक्षा आहे.

चित्रपटसृष्टीतील आणि प्रेक्षकांचं याकडे आता लक्ष लागले आहे की हा चित्रपट पूर्वीप्रमाणेच नवा वाद निर्माण करतो का, आणि विवेक अग्निहोत्री यांची ही फाइल्स सिरीज पुढे कोणत्या विषयाकडे वळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish