Language: English Hindi Marathi

लोणावळा शहरात “हर घर तिरंगा” जनजागृती रॅली

लोणावळा,प्रतिनिधी-स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना येणार्‍या 15 ऑगस्ट रोजी देशातील सर्व घरांवर तिरंगा फडकविण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. याकरिता हर घर तिरंगा अभियानाची जनजागृती करण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने “हर घर तिरंगा” जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. लोणावळा शहरातील सर्व शाळांचे विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. मावळा पुतळा चौकातून या रॅलीला सुरुवात झाली. तर नगरपरिषद कार्यालयासमोर विद्यार्थी, पोलिस यांना स्वच्छ लोनावळा हरित लोनावळा ठेवण्यासाठी शपथ देण्यात आली. त्यानंतर या रैलीची सांगता झाली .रॅली मध्ये प्रत्येक शाळेचे विद्यार्थी शालेय गणवेशात सहभागी झाले होते. रॅली मध्ये हर घर तिरंगा या विषयावर देशभक्तीपर घोषणांचे फलक विद्यार्थ्यांच्या हातात होते.

Leave a Reply

Your email address will not be published.