Language: English Hindi Marathi

लोणावळा पुणे लोकलच्या 14 फेऱ्या वाढल्या.

लोणावळा,प्रतिनिधी-लोणावळा पुणे  लोकलने प्रवास करणाऱ्यांना दिलासा, लोकलच्या 14 फेऱ्या वाढवण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय.या फेऱ्या तीन टप्प्यांत वाढविल्या जाणार असून सध्या या मार्गावर 26 फेऱ्या सुरु आहेत. 8 ऑगस्ट रोजी लोकलच्या 4 फेऱ्या , 15 ऑगस्ट रोजी 6 फेऱ्या आणि 22 ऑगस्टला 4 फेऱ्या वाढणार.मात्र दुपारच्या चार फेऱ्या अद्याप सुरू न झाल्याने पिंपरी-चिंचवड प्रवासी संघटनांची नाराजी कायम आहे.कोरोनाच्या सावटामध्ये रेल्वे प्रशासना कडून लोकलच्या फेऱ्या कमी केल्या होत्या.आता सर्व निर्बंध काढल्या नंतर आता पुन्हा लोकल फेऱ्या देखील पूर्ववत होताना दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.