नाशिक पुणे महामार्गावरून पुण्याला मोठ्या प्रमाणात आईसर ट्रक मध्ये लाखो रुपयांचा अवैध गुटखा येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारा कडून चाकण पोलिसांना मिळाली,त्या आधारे चाकण पोलिसांनी नाशिक पुणे महामार्गावरील रोहकल फाट्याजवळ सापळा रचून या टेम्पोला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले, यात कारवाईत 91 लाख 20 हजार रुपये किमतीचा आर एम डी कंपनीचा गुटखा आणि टाटा कंपनीचा टेम्पो असा एकूण 1 कोटी 1 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून टेम्पो चालक आरोपी नामे गणेश भाडले (वय 32) याला ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई चाकण पोलिस करत आहेत.