अँकर : वाढत्या महागाई विरोधात आज पिंपरी चिंचवडमध्ये ही आंदोलन पार पडलं. यावेळी काय झाडी, काय डोंगार…. काय दरवाढ… काय दरवाढ अशी घोषणाबाजी करण्यात आली. महिला राष्ट्रवादी काँग्रेसने भरपावसात हे आंदोलन केलं. आधीच महागाईने जनता होरपळली असताना आता गॅस, सीएनजीच्या दरात आणखी वाढ झालीये. हीच दरवाढ कमी करून जनतेची महागाईच्या कचाट्यातून सुटका करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.