Language: English Hindi Marathi

युनिक व्हिजनच्या प्रांगणात आनंदवारी उत्साहात साजरी

चिंचवड, ता. 30 : हेचि दान देगा देवा | तुझा विसर न व्हावा….या युक्ती प्रमाणे आषाढीवारी चा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी व भागवत धर्माची महती विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्यासाठी तसेच ३५० वर्ष जुनी दिंडी परंपरा समजण्यासाठी युनिक व्हीजन इंग्लिश मिडियम स्कूल, चिंचवडेनगर च्या प्रांगणात नर्सरी, प्रायमरी, १ ली ते १० वी सर्व विद्यार्थ्यांच्या हरिनामाच्या जयघोषात पाद्यपूजनाने  आनंदवारीला उत्साहात सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत तुकाराम, संत नामदेव अशा वेशभूषा केल्या होत्या. इतर सर्व विद्यार्थी वारकरी वेशात आले होते. इ ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी भजन, गौळण, भारुडे, सादर केली.
सौ. मनीषा बलकवडे, सौ. भारती मसाले, कु. मानसी पानसे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.यावेळी शाळेच्या संचालिका अश्विनीताई चिंचवडे, मुख्याध्यापिका सौ. रजनी दुवेदी, सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी सहभागी झाले होते. बालवारक-यांच्या रिंगणाने व हरिनामाच्या गजराने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published.