Language: English Hindi Marathi

राज्याच्या मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस

मुंबई, प्रतिनिधी-महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन होणार असून मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे.इतर मंत्री मंडळाचा विस्तार येत्या काही दिवसात होणार असून आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदासाठी शपथ सोहळा राजभवन येथे पार पडत आहे.शिवसेने पासून एकनाथ शिंदे यांच्या सोबत 39 शिवसेनेचे तर 11 अपक्ष आमदार असा एक गट महाविकास आघाडी मधून बाहेर पडून ठाकरे सरकारला पायउतार व्हावे लागले.आज सकाळपासून राज्यात मोठ्या राजकीय घडमोडीनां वेग आला होता जो संध्याकाळ पर्यंत आजच नवीन सरकारचा शपथ विधी होण्याचे संकेत मिळत होते त्यानुसार आता राज्यात नवीन सरकार स्थापन होत असून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत राज्यात शिंदे सरकार आता कार्यरत होणार हे आता स्पष्ट झाले आहे.तर शिंदे सरकार मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.