पाकिस्तानचा क्रिकेटपटू आसिफ अलीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय

लाहोर, २ सप्टेंबर:पाकिस्तानचा मधल्या फळीतील फलंदाज आसिफ अली याने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ३३ वर्षीय आसिफने आपल्या निवृत्तीची घोषणा करताना पाकिस्तानसाठी खेळणे हा आपल्या कारकिर्दीतील सर्वात अभिमानास्पद क्षण असल्याचे सांगितले.

फैसलाबाद येथील आसिफ अलीने २०१९ च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये आणि २०२१ व २०२२ च्या टी२० विश्वचषक स्पर्धांमध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं. त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी तो विशेष ओळखला जातो.

निवृत्तीबाबत बोलताना आसिफ म्हणाला, “पाकिस्तानची जर्सी परिधान करणे ही माझ्या करिअरमधील सर्वात मोठी गोष्ट होती. संघासाठी अनेक चढ-उताराच्या क्षणी मैदानावर उभं राहण्याची संधी मिळाली, याचा मला खूप अभिमान आहे.”

आसिफ अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी तो देशांतर्गत आणि विविध देशांतील फ्रँचायझी लीग्समध्ये खेळत राहणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

hi_INHindi