“चाँदभाईचे नाव घेऊन बोला” – मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपला टोला

कल्याण, ५ ऑगस्ट: कल्याणमध्ये रविवारी पार पडलेल्या भाजप पक्ष प्रवेश कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. चव्हाण यांनी “कल्याण-डोंबिवलीच्या विकासाला लागलेले ग्रहण दूर करायचे असेल तर भाजपचा महापौर हवा”, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

या विधानाचा धागा पकडत मनसेचे नेते राजू पाटील यांनी सोशल मीडियावरुन जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी आपल्या ‘एक्स’ (पूर्वी ट्विटर) वरील पोस्टमध्ये भाजपला टोला लगावत म्हटले की, “आपण पालिकेत ३० वर्षे शिवसेनेच्या सत्तेबरोबर सहभागी होतात, मग त्या पापात सहभागी व्हायचे नसेल तर ‘विकासाला ग्रहण लावणाऱ्या चाँदभाईचे नाव घेऊन बोला'”.

राजू पाटील यांच्या या विधानामधून त्यांनी भाजपच्या पूर्वीच्या युतीधारक भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गेल्या काही दशकांपासून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता राहिली असून, त्यात भाजप अनेकदा भागीदार राहिला आहे. त्यामुळे विकासाच्या अडथळ्यांची जबाबदारी फक्त इतरांवर ढकलणे योग्य नाही, असा राजू पाटील यांचा सूर आहे.

राजू पाटील यांचे “चाँदभाई” हे उदाहरण उपरोधिक असून, त्यातून त्यांनी स्थानिक राजकारणातील दिशाहीनतेवर टीका केली आहे. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीने कल्याण-डोंबिवलीत राजकीय वातावरण चांगलेच

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

hi_INHindi