पुणे खंडपीठाच्या मागणीत आता खासदार सुप्रिया सुळे यांचीही उडी

पुणे, ५ ऑगस्ट: पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्यात यावे, अशी जोरदार मागणी आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही केली आहे. पुणे जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना न्यायालयीन कामांसाठी मुंबईपर्यंत प्रवास करावा लागतो, हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.

सुळे म्हणाल्या, “इंदापूरसारख्या तालुक्यांतील अनेक गावं मुंबईपासून तब्बल ३०० ते ३५० किलोमीटर अंतरावर आहेत. अशा लांबच्या प्रवासामुळे सामान्य नागरिकांना वेळ, पैसा आणि त्रास यांचा मोठा सामना करावा लागतो. त्यामुळे कोल्हापूरप्रमाणे पुण्यातही उच्च न्यायालयाचे खंडपीठ असणे अत्यावश्यक आहे.”

या मागणीमुळे पुण्यात खंडपीठ स्थापन करण्याच्या आंदोलनाला अधिक राजकीय पाठिंबा मिळू लागला आहे. यापूर्वी अनेक वकिल संघटनांनी, स्थानिक जनप्रतिनिधींनी आणि नागरिकांनीही ही मागणी सातत्याने केली होती. आता सुप्रिया सुळे यांच्यासारख्या प्रमुख लोकप्रतिनिधीने पुढाकार घेतल्यामुळे राज्य शासनावर याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचा दबाव वाढण्याची शक्यता आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून मुंबईपर्यंत न्यायासाठी होणारा प्रवास हा नागरिकांसाठी खर्चिक आणि वेळखाऊ ठरतो. त्यामुळे, पुण्यासारख्या मोठ्या आणि वेगाने वाढणाऱ्या शहरात खंडपीठ असणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

सुळे यांनी ही मागणी राज्य शासनाकडे अधिकृतरित्या सादर केली असून, लवकरच यावर निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

hi_INHindi