शाहरुख खानला शशी थरूरचे साधे अभिनंदन; मजेशीर प्रत्युत्तरात म्हणाला – “अधिक गूढ लिहिलं असतं तर मला कळलंच नसतं!”

नवी दिल्ली (4 ऑगस्ट): राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्याबद्दल काँग्रेसचे खासदार आणि भाषाप्रभुत्वासाठी प्रसिद्ध असलेले शशी थरूर यांनी अभिनेता शाहरुख खानचे अभिनंदन साध्या शब्दांत केले, पण शाहरुखने दिलेले प्रत्युत्तर मात्र थोडेच साधे होते! उलट वाचकांना डिक्शनरी उघडावी लागली. थरूर यांनी सोशल मीडियावर (X – पूर्वीचे ट्विटर) लिहिले,”A National Treasure wins a National Award. Congratulations @iamsrk.”
(एक राष्ट्रीय संपत्तीने राष्ट्रीय पुरस्कार जिंकला. अभिनंदन शाहरुख.)या साध्याशा वाक्याच्या उत्तरात शाहरुखने लिहिले:Thank u sir. If you had used a bigger word than ‘congratulations’, I wouldn’t have understood it.”
(धन्यवाद सर. जर तुम्ही ‘congratulations’ पेक्षा मोठा शब्द वापरला असता, तर मला त्याचा अर्थच समजला नसता.)शाहरुखच्या या मजेशीर उत्तराने नेटकऱ्यांमध्ये हास्याची लाट उसळली. नेहमी गूढ आणि क्लिष्ट इंग्रजी वापरणारे थरूर यांना खुद्द शाहरुखनेच गमतीने टोला लगावल्यासारखे वाटले.

अनेकांनी ही मजेशीर शाब्दिक जुगलबंदी आवडल्याचे प्रतिक्रिया देत शेअर केली. शाहरुख खानला नुकताच 2023 मधील आपल्या सुपरहिट चित्रपट ‘जवान’ मधील भूमिकेसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार जिंकल्यानंतर देशभरातून त्याला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.शशी थरूर यांचं इंग्रजी शब्दसंपत्तीचं कौतुक जगभरात केलं जातं. त्यांच्या ट्विट्स किंवा भाषणांमध्ये नेहमीच असामान्य आणि उच्च प्रतीचे शब्द वापरले जातात. त्यामुळे शाहरुखने दिलेले हे “preemptive strike” (पूर्व सूचना स्वरूपातील मजेशीर टोला) सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

hi_INHindi