पुणेतील धक्कादायक घटना: ७ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला जन्मठेप; डीएनए चाचणी आणि निर्भय साक्षीमुळे न्याय

पुणे, २२ जुलै २०२५: चॉकलेटचे आमिष दाखवून एका सात वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून दगडाने जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला विशेष न्यायालयाने जन्मठेप आणि ₹३०,००० रुपयांचा दंड अशी कठोर शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात पीडित मुलाची निर्भय साक्ष, डीएनए चाचणीचा अहवाल, तसेच आई आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षीमुळे न्यायालयाने दोष सिद्ध मानला.

या प्रकरणाचा निकाल विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांनी दिला. उमेश विष्णू जाधव (वय ४०, रा. उत्तमनगर, पुणे, मूळ रा. कुर्डुवाडी, सोलापूर) असे दोषी आरोपीचे नाव आहे. पीडित मुलाच्या आईने उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

ही धक्कादायक घटना २६ जुलै २०१६ रोजी रात्री साडेसातच्या सुमारास घडली होती. आरोपीने मुलाला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून त्याला खोलीत बोलावले, त्यानंतर रुमालाने गळा दाबून अनैसर्गिक अत्याचार केला. अत्याचारानंतर मुलावर मारहाण केली गेली, ज्यामध्ये त्याच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या.

पोलिस तपासानंतर पीडित मुलाचा वैद्यकीय अहवाल, घटनास्थळावरील पुरावे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डीएनए चाचणीचा निकाल आरोपीशी मिळताजुळता असल्याचे स्पष्ट झाले. या पुराव्यांवर आधारित न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

या निकालाने न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला असून, लहान मुलांवरील अत्याचारासंदर्भात कठोर कारवाईचा महत्त्वपूर्ण संदेशही समाजात गेला आहे.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

hi_INHindi