हाशिम बाबा टोळीचा शार्पशूटर नादिम उर्फ काळिया दिल्लीतील चांदणी महल परिसरातून अटक; अमेरिकन बनावटीची पिस्तुल जप्त

नवी दिल्ली, 22 जुलै: दिल्ली पोलिसांनी कुख्यात हाशिम बाबा टोळीचा शार्पशूटर नादिम उर्फ काळिया (वय 41) याला अटक केली आहे. 20 जुलै रोजी चांदणी महल परिसरातून झालेल्या या कारवाईत नादिमकडून अमेरिकन बनावटीची पिस्तुल जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

नादिमवर 13 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल असून, त्यामध्ये MCOCA (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गतही प्रकरणे आहेत. काही महिन्यांपूर्वीच तो तुरुंगातून बाहेर आला होता आणि त्यानंतर तो पुन्हा बेकायदेशीर शस्त्र तस्करीच्या रॅकेटमध्ये सक्रिय झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिस तपासात असेही समोर आले आहे की नादिम हाशिम बाबा, छेनू आणि नासिर टोळ्यांशी थेट संबंधीत आहे, आणि तो अनेक वर्षांपासून गुन्हेगारी विश्वात सक्रीय आहे. त्याला अटक करताना पोलिसांनी त्याच्याकडून अत्याधुनिक विदेशी शस्त्र हस्तगत केल्याचेही सांगितले.

दिल्ली पोलिसांच्या मते, नादिम हा ‘हॅबिच्युअल ऑफेंडर’ (नेहमी गुन्हा करणारा) आहे आणि त्याच्या अटकेमुळे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांच्या हालचालींना मोठा धक्का बसला आहे. सध्या पोलिस अधिक तपास करत असून, त्याच्या संपर्कातील इतर गुन्हेगारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

ही अटक राजधानी दिल्लीतील शस्त्र तस्करी व संघटित गुन्हेगारीविरोधातील मोहीमेला मोठे यश मानले जात आहे.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

hi_INHindi