आसाममध्ये ₹८ कोटींची गांजा जप्त; दोन आरोपी अटकेत

गुवाहाटी (१६ सप्टेंबर): आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे ₹८ कोटींकी गांजा जप्त केली असून, दोन जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

बोकाजन उपविभागातील डिल्लाई परिसरातील सर्व चेकपोइंट्सवर पोलिसांनी तपासणी मोहीम सुरू केली होती. गुप्त माहितीच्या आधारे ही मोहीम राबवण्यात आली. तपासादरम्यान एक संशयित ट्रक थांबवून त्याची कसून झडती घेण्यात आली.

झडतीदरम्यान ट्रकमधील गुप्त कप्प्यात लपवलेले १४८ पॅकेट्स आढळून आले. या पॅकेट्समध्ये एकूण १४७.२५ किलोग्रॅम गांजा असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ट्रकमधून हे अमली पदार्थ अन्य राज्यात तस्करी करण्याचा प्रयत्न होता. अटक करण्यात आलेल्या दोघांविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई अमली पदार्थ विरोधी अभियानाचा एक भाग असून, पोलिसांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवहारांवर अंकुश ठेवण्यासाठी तपासणी अधिक तीव्र केली आहे.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

hi_INHindi