आदर्श गणेशोत्सव व संयुक्त विसर्जन मिरवणूकची परंपरा लक्ष्मी रस्त्यावरील दोन मोठ्या सार्वजनिक मंडळांनी , श्री गजानन मंडळ व गरुड गणपती मंडळ यांनी सलग ११ व्या वर्षी कायम ठेवली व पोलिस प्रशासनाने आखून दिलेल्या शिस्तीचे पालन करून विसर्जन पार पाडले.

आदर्श गणेशोत्सव व संयुक्त विसर्जन मिरवणूकची परंपरा लक्ष्मी रस्त्यावरील दोन मोठ्या सार्वजनिक मंडळांनी , श्री गजानन मंडळ व गरुड गणपती मंडळ यांनी सलग ११ व्या वर्षी कायम ठेवली व पोलिस प्रशासनाने आखून दिलेल्या शिस्तीचे पालन करून विसर्जन पार पाडले.

खरेतर आजच्या काळात विसर्जन मिरवणूकला लागत असलेला वेळ कमी करण्यासाठी प्रशासन जी पावले उचलत आहे त्यापासून अद्याप काहीही साध्य झालेले नाही. तसेच अशाप्रकारे उपक्रम राबवून संयुक्त विसर्जन मिरवणूक हा विषय, सामाजिक स्तरावर अशक्य असताना सन २०१५ पासून पुणे शहरातील ही दोन मोठी मंडळे सर्व फाफटपसारा बाजूला सारून, फक्त १ पथक, १ ट्रॅक्टर व १ जनरेटर वाहन व मंडळाचे कार्यकर्ते पांढऱ्या शुभ्र पोशाखात. इतकी चांगली शिस्तबध्द विसर्जन मिरवणूक काढल्यानंतर सुद्धा प्रसारमाधमांनी इतकेच काय श्री गजानन मंडळाच्या शेजारी असणाऱ्या “दैनिक प्रभात” जे पुणे शहरातील अतिशय जुने व आदर्श वृत्तपत्र आहे, त्यांच्या पत्रकारांनी सुद्धा या अतिशय चांगल्या उपक्रमाची, साधी २ कॉलमची छायाचित्र सहित बातमी प्रसिद्ध करू शकले नाहीत. खरेतर हा उपक्रम समाजाला व १३५ वर्षाच्या पुणे येथील सार्वजनिक गणेशोत्सवाला दिशा दाखवण्याचे काम करीत आहे.

वृत्तपत्र संपादक अथवा पत्रकारांचे खरे काम म्हणजे सामाजिक उत्तरदायित्व असलेल्या संस्था, अथवा सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्र, मंडळे ज्यांच्या कार्यातून समाजाला सामाजिक संदेश दिला जातो, त्या बातम्यांना ठळक प्रसिद्धी देणे, जेणेकरून संबंधित संस्थेला अथवा सामाजिक स्तरावर काम करणाऱ्या मंडळांना प्रोत्चाहन मिळते, म्हणजेच अशा संस्था अथवा सार्वजनिक मंडळे भविष्यात आणखीन चांगले काम करतील. मात्र या दोन मंडळांच्या इतक्या चांगल्या उपक्रमाला जर प्रसारमाध्यमे दाद देणार नसतील तर मग सामाजिक काम का करावे असा प्रश्न या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. नंतर समाजाला चांगले कार्यकर्ते दिसणार नाहीत व गणेशोत्सव बाबत कायम उलट सुलट चर्चा होत राहील.

खरेतर पुणे येथील सार्वजनिक गणेशोत्सवा मधून खूप मोठी ऊर्जा मिळाल्यानंतर आपल्या शहरातील अनेक सामान्य नागरिक थेट नगरसेवक, महापौर, आमदार व खासदार झालेत. एवढेच काय तर राज्य व केंद्रात मंत्री झालेत. यावरुण सार्वजनिक कार्यातून मिळालेल्या ऊर्जेचा योग्य वापर झाल्याचे दिसून आले आहे.

मला आपणास एवढेच सुचवायचे आहे की जे चांगले काम करतात, चांगले सामाजिक उपक्रम राबवतात, समाजाला दिशा दाखवतात त्यांच्या कार्याची दखल प्रसारमाध्यमांनी नक्की घ्यावी व त्यांना सहकार्य करून त्यांनी केलेल्या कार्याची बातमी प्रसिद्ध करावी. धन्यवाद.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

hi_INHindi