भारतीय उद्योजिका शारदा नारायणन यांना “Mrs. Classique Globe – Choice of the People” पुरस्कार 2025

बेंगळुरू/कॅलिफोर्निया, 22 जुलै: भारतीय फॅशन उद्योजिका आणि समाजसेविका शारदा नारायणन यांनी अमेरिका येथील पाम स्प्रिंग्समध्ये आयोजित Mrs. Classique Globe® 2025 स्पर्धेत “Choice of the People” हा प्रतिष्ठित जागतिक पुरस्कार पटकावला आहे. 21 जून रोजी वेस्टिन रँचो मिराज गोल्फ रिसॉर्ट आणि स्पामध्ये हा सोहळा पार पडला.

हा पुरस्कार जगभरातील सार्वजनिक मतदानावर आधारित असून त्या प्रतिनिधीला दिला जातो ज्यांच्या कथेमुळे, ध्येयामुळे आणि व्यक्तिमत्त्वामुळे जगभरातील लोक भावनिकदृष्ट्या जोडले जातात. शारदा नारायणन यांच्या प्रामाणिकपणा, आत्मविश्वास आणि ध्येयवेडेपणा यामुळे त्या लवकरच प्रेक्षकांच्या आवडत्या ठरल्या.

भारताकडून या पुरस्काराची मानकरी ठरणाऱ्या शारदा या पहिल्याच महिला आहेत. विजयानंतर बोलताना त्यांनी म्हटले, “हे मुकुट फक्त सौंदर्याचं प्रतिक नाही, तर ध्येय, चिकाटी आणि स्वतःच्या प्रवासावर विश्वास ठेवण्याची शक्ती यांचंही प्रतीक आहे. जीवनात कितीही अडथळे आले, तरी आपल्या मूल्यांशी आणि स्वप्नांशी प्रामाणिक राहिलं, तर यश नक्कीच मिळतं.”

शारदा नारायणन यांचे हे यश भारतीय महिलांसाठी प्रेरणादायक ठरत आहे, विशेषतः त्या महिलांसाठी ज्या व्यवसाय, समाजसेवा आणि स्वतःचा मार्ग तयार करत आहेत.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

hi_INHindi