पुणे पोर्श प्रकरण: आरोपीला प्रौढ म्हणून सुनावणी घेण्याची मागणी

पुणे (२४ जून): मागील वर्षी कळ्याणी नगरमध्ये झालेल्या दुर्दैवी पोर्श गाडीच्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आता सरकारी पक्षाने बाल न्याय मंडळाकडे जोरदार मागणी केली आहे की, आरोपी १७ वर्षीय मुलावर प्रौढ म्हणून खटला चालवण्यात यावा.

सरकारी वकीलांनी सांगितले की, “हा अपघात नव्हे तर एक गंभीर व अमानवी कृत्य आहे. आरोपी मद्यधुंद अवस्थेत पोर्श गाडी चालवत होता आणि त्याने दुचाकीवर असलेल्या दोन आयटी प्रोफेशनल्सना चिरडले.”

ही घटना १९ मे २०२४ रोजी पुण्याच्या कळ्याणी नगर भागात घडली होती. मृत्यूमुखी पडलेले अनिश अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा हे दोघेही दुचाकीवरून जात होते, तेव्हा आरोपीने त्यांच्यावर भरधाव वेगात गाडी चालवून धडक दिली होती.

या प्रकरणाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते. या घटनेला आता एक वर्ष होत आले असले तरी पुणे पोलिसांनी केलेली आरोपीला प्रौढ म्हणून सुनावणी घेण्याची मागणी अजूनही बाल न्याय मंडळात प्रलंबित आहे.

सरकारी वकीलांनी ठामपणे सांगितले की, “अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये वयापेक्षा गुन्ह्याचं स्वरूप महत्त्वाचं असतं. आरोपीची मानसिकता आणि वर्तन पाहता, त्याला प्रौढ मानूनच न्याय द्यावा.”

या प्रकरणावर काय निर्णय होतो, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

hi_INHindi