अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकन दूतावासाची सावधगिरी: शिक्षण अर्धवट सोडल्यास वीजा रद्द होऊ शकतो

दी मीडिया टाइम्स डेस्क 

नवी दिल्ली: भारतात स्थित अमेरिकन दूतावासाने अमेरिकेतील शिक्षण घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय, विशेषतः भारतीय विद्यार्थ्यांना मंगळवारी एक महत्त्वाची सूचना दिली आहे. दूतावासाने स्पष्टपणे सांगितले की, जर एखादा विद्यार्थी त्याच्या संस्थेला कोणतीही पूर्वसूचना न देता शिक्षण अर्धवट सोडतो, वर्गांमध्ये हजेरी लावत नाही किंवा आपल्या अभ्यासक्रमातून बाहेर पडतो, तर त्याचा F-1 किंवा M-1 प्रकाराचा विद्यार्थी वीजा रद्द केला जाऊ शकतो.

अमेरिकन दूतावासाने समाजमाध्यम प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचा ट्विटर) वर पोस्ट करत विद्यार्थ्यांना त्यांच्या वीजाच्या अटी व शर्तींचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी आपला अधिकृत विद्यार्थी दर्जा कायम ठेवणे फारच आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही कायदेशीर अडचणीपासून वाचता येईल.”

विद्यार्थ्यांनी त्यांच्या संस्थेशी सातत्याने संपर्कात राहावे, वेळेवर वर्गांना उपस्थित राहावे आणि त्यांच्या अभ्यासक्रमात नोंदणी कायम ठेवावी, असे दूतावासाचे म्हणणे आहे. तसेच, जर कोणत्याही वैयक्तिक किंवा शैक्षणिक कारणांमुळे शिक्षणात अडथळा येत असेल, तर ते तत्काळ त्यांच्या शैक्षणिक सल्लागाराशी किंवा संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधावा.ही सूचना अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी ही माहिती गांभीर्याने घेऊन त्यांची वीजा स्थिती बिनबोभाट ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांचे शिक्षण आणि भविष्य दोन्ही सुरक्षित राहील.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

hi_INHindi