ऑपरेशन सिंदूर फक्त एक नाव नाही, हे देशाच्या कोट्यवधी जनतेच्या भावना आहेत: नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात अलीकडच्या काळातील भारताच्या सामरिक शक्तीचा आणि संयमाचा उल्लेख करत सांगितले की, देशाने कठीण परिस्थितीतही अद्वितीय धैर्य दाखवले आहे. त्यांनी विशेषतः भारतीय सशस्त्र बलांचे, गुप्तचर यंत्रणांचे आणि शास्त्रज्ञांचे कौतुक केले आणि त्यांना संपूर्ण देशाच्या वतीने सलाम केला.

ऑपरेशन सिंदूर”चा उल्लेख करताना त्यांनी म्हटलं की हा मोहिम आपल्या शूर सैनिकांच्या अतुलनीय शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक आहे. हा ऑपरेशन भारताच्या सुरक्षेचे, सार्वभौमत्वाचे आणि धोरणात्मक ताकदीचे प्रतिबिंब आहे.

पंतप्रधान मोदी यांनी हेही स्पष्ट केलं की भारत केवळ शांततेचा इच्छुक आहे, पण गरज पडल्यास शत्रूंना सडेतोड उत्तर देण्यास सक्षम आहे.ते पुढे म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूर फक्त एक नाव नाही, हे देशाच्या कोट्यवधी जनतेच्या भावना आहेत. ऑपरेशन ही न्यायासाठी दिलेली अखंड प्रतिज्ञा आहे. ६ मे च्या रात्री आणि ७ मे च्या पहाटे, संपूर्ण जगाने ही प्रतिज्ञा प्रत्यक्षात साकारताना पाहिली आहे. भारतीय सेनेने पाकिस्तानातील दहशतवादाच्या ठिकाणांवर, त्यांच्या प्रशिक्षण केंद्रांवर अचूक हल्ले केले. दहशतवाद्यांनी स्वप्नातसुद्धा विचार केला नसेल की भारत एवढा मोठा निर्णय घेईल. पण जेव्हा देश एकत्र येतो, राष्ट्र सर्वोपरि मानतो, तेव्हा असे पोलादी निर्णय घेतले जातात आणि त्याचे परिणामही दाखवले जातात.

पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर भारताच्या क्षेपणास्त्रांनी आणि ड्रोन हल्ल्यांनी केवळ इमारतीच नाही, तर त्यांच्या मनोबलालाही हादरवून टाकले. बहावलपूर आणि मुरीदकेसारखी ठिकाणं ही एकप्रकारे जागतिक दहशतवादाची ‘युनिव्हर्सिटी’ होती. जगात कुठेही झालेले मोठे दहशतवादी हल्ले – मग ते 9/11 असो, लंडन बॉम्बस्फोट असो किंवा भारतातील दशकांपासूनचे मोठे हल्ले असोत – त्यांचे धागेदोरे कुठे ना कुठे या अड्ड्यांशी जोडलेलेच होते.”

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

hi_INHindi