महाराष्ट्र सरकारकडून AVGC-XR धोरण मंजूर; 2050 पर्यंतचा रोडमॅप निश्चित

मुंबई (१६ सप्टेंबर): महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंगळवारी अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्स्टेंडेड रिऍलिटी (AVGC-XR) धोरण 2025 मंजूर केले असून, 2050 पर्यंतचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या धोरणांतर्गत पुढील 20 वर्षांत सुमारे 2 लाख नोकऱ्या निर्माण होतील आणि ₹50,000 कोटींची गुंतवणूक आकर्षित होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या धोरणाअंतर्गत, AVGC-XR क्षेत्रासाठी विशेष पार्क आणि केंद्रे उभारण्यात येणार आहेत. मुंबई, नवी मुंबई, पुणे, सातारा आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा असलेली हब्स विकसित केली जातील. यामुळे युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील आणि महाराष्ट्र हे या क्षेत्रातील आघाडीचे केंद्र बनेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हे धोरण मंजूर करण्यात आले. त्यांनी सांगितले की, “AVGC-XR ही भविष्यातील मोठी उद्योगश्रेणी आहे आणि महाराष्ट्र या क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी सज्ज आहे.”

हे धोरण राज्यातील डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देणार असून, स्थानिक तरुणाईसाठी प्रशिक्षण, स्टार्टअप्सला प्रोत्साहन आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूक यांचा समावेश असलेल्या योजना आखण्यात येतील.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

hi_INHindi