Language: English Hindi Marathi

पिंपरी चिंचवडच्या काही भागात पाणी पुरवठा विस्कळीत.

पिंपरी,प्रतिनिधी-पिंपरी-चिंचवड पालिका पाणी पुरवठा विभाग रावेत येथील जलउपसा केंद्रातील भोसरी आणि चिंचवड विभागाला पाणी पुरवठा करणारी पाइपलाईनची पाणी गळती होत असल्याने त्याची दुरुस्ती करण्याकरिता आज शनिवार आणि उद्या रविवार असे दोन दिवस शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे,भोसरी आणि चिंचवड विभागात येणारी भोसरी, गावठाण, इंद्रायणीनगर, बो-हाडेवाडी, मोशी, च-होली, डुडुळगाव, दिघी, संत तुकारामनगर, मॅगझीन परिसर, बोपखेल, प्रेमलोक पार्क, चिंचवडगाव, पवनाननगर, रस्टन कॉलनी, सुदर्शन नगर, प्रा. रामकृष्ण मोरे परिसर, पिंपरीगाव, पिंपरीनगर, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव, दापोडी, जुनी सांगवी, नवी सांगवी, नेहरुनगर, वल्लभनगर, कासारवाडीचा रेल्वे गट वरील परिसर, प्राधिकरण सेक्टर क्रमांक 23 आणि 26, सिद्धिविनायकनगरी, वाहतूकनगरी इत्यादी भागाचा दुपार, संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. महापालिका प्रशासनाने पाणी जपून वापरण्याचे आवाहन नागरिकांना केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.