Language: English Hindi Marathi

संत निरंकारी मिशनद्वारा रुपीनगर येथे  रक्तदान शिबिराचे आयोजन….

प्रतिनिधी  :  संत निरंकारी मिशन पुणे झोन मधील रुपीनगर ब्रांच येथे संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन संत निरंकारी सत्संग भवन, बांबू हाऊस शेजारी भक्ती-शक्ती चौक रुपीनगर, निगडी या ठिकाणी रविवार ७ ऑगस्ट २०२२ रोजी करण्यात आले आहे.
             संत निरंकारी मिशनद्वारे पहिल्या रक्तदान शिबिराचे आयोजन दिल्ली येथे नोव्हेंबर १९८६ मध्ये संत निरंकारी समागमामध्ये करण्यात आले होते, ज्याचे  उदघाटन बाबा हरदेव सिंह जी महाराज यांनी केले होते आणि हि मोहीम मिशनच्या अनुयायांद्वारे  मागील ३६ वर्षांपासून निरंतर अशीच चालू असून त्यात आतापर्यंत ७२६५ रक्तदान शिबीर संपन्न झाली असून  १२,०३,८८० युनिट रक्त संकलन करण्यात आले आहे. बाबा हरदेव सिंह जी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला कि ‘रक्त नाल्यांमध्ये नाही , नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे’. संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे.
            संत निरंकारी मिशन द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे  उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी ,नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता  यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी  भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.