Language: English Hindi Marathi

हर घर तिरंगा अभियान अंतर्गत पुणे महानगरपालिके मार्फत

१५ ऑगस्ट २०२२ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळालेल्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. त्या निमित्ताने केंद्र सरकारने भारतीय स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव उपक्रम आयोजित केला आहे.
या निमित्त पुणे महानगरपालिकेकडून “हर घर तिरंगा” उपक्रमा अंतर्गत पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा, क्षेत्रीय कार्यालय, पुणे स्मार्ट सिटी यांचेकडून विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानांतर्गत बालेवाडी येथे बालेवाडी वेलफेयर फेडरेशन तर्फे वृक्षा रोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्त स्मार्ट सिटी सीईओ डॉ संजय कोलते व सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे  यांच्या हस्ते वृक्ष रोपण करण्यात आले.तसेच मा. सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांनी  औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील रहिवासी असणारे स्वातंत्र्य सैनिक यांचे निवास स्थानी जाऊन त्यांना शाल श्रीफळ व गुलाबाचे फुल देऊन कृतज्ञता व्यक्त केली.
 विकास मोरे (वरीष्ठ आरोग्य निरीक्षक),सचिन बिबवे (आरोग्य निरीक्षक), संजय कांबळे (मुकादम), दयानंद पाटोळे ( मुकादम), वैभव साबळे ( वॉर्ड समन्वयक स्वच्छ) यांनी जिल्हा परिषद शाळा उंड्री येथे पुणे महानगर पालिका व स्वच्छ संस्था यांच्या वतीने घरोघरी तिरंगा आणि स्वच्छता मोहीम घेतली. यावेळेस मुख्याध्यापिका  सुरेखा माटे, पदवीधर शिक्षक राजेंद्र कुंभारकर उपस्थित होते. सदर कार्यक्रम प्रसंगी  सर्व विद्यार्थ्यांना घर घर तिरंगा या मोहिमेची माहिती देण्यात आली तसेच स्वच्छतेबद्दल जनजागृती करण्यात आली.
 महापालिका सहाय्यक आयुक्त आशिष महाडदळकर यांनी अमृत महोत्सवनिमित्त विविध वीर स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार केला.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत पुणे महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागाचे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर क्रीडा निकेतन  शाळा क्रमांक ८३ बी माळवाडी, हडपसर पुणे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या वतीने वेगवेगळ्या रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा अशा  विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
              श्री शिवाजी विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय औंध पुणे ७ यांच्या विद्यार्थ्यांनी रांगोळी मधून जनजागृतीचे संदेश तसेच देश भक्तीची गाणी इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.