Language: English Hindi Marathi

रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

 पिंपरी,प्रतिनिधी- रयत विद्यार्थी विचार मंच संस्था ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाकरिता व  शैक्षणिक मदतीकरिता कार्यरत करत आहे.संस्थेच्या वतीने रविवार दिनांक 07 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक,कामगार भवन शेजारी पिंपरी येथे  दहावी  व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
       सदर कार्यक्रमासाठी व विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालकेचे अतिरिक्त आयुक्त  उल्हास जगताप तसेच पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर ,जनसपंर्क अधिकारी किरण गायकवाड  हे प्रमुख मार्गदर्शक व  कार्यक्रमाचे स्वागत  अध्यक्ष धम्मराज साळवे  उपस्थित राहणार आहेत .
   विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र तसेच विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व कळावे या उद्देशाने विविध झाडांचे रोप देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.