Language: English Hindi Marathi

कोविशील्डचा पुरवठा सुरळीत करा – सचिन साठे.

पिंपरी (दि. ४ ऑगस्ट २०२२) कोविड लस अमृत महोत्सव अंतर्गत १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना बूस्टर डोस मोहिमे मधील कोविडशिल्ड आणि कोवॅक्सिंन लस देण्यात येत आहे.  केंद्र सरकारच्या वतीने “आझादी का अमृतमहोत्सव” अंतर्गत
हा उपक्रम देशभर राबविण्यात येत आहे. (दि.१५ जुलै २०२२ ते ३० सप्टेंबर २०२२) ७५ दिवसांपर्यंत सर्व नागरिकांना बूस्टर डोस मोफत देण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे.
या मोहिमेला नागरिक उस्फुर्त प्रतिसाद देत आहेत. मात्र, देशात सर्वाधिक नागरीकांनी “कोविडशिल्ड” लसीचे दोन डोस यापूर्वी घेतले आहेत. त्यांना बूस्टर डोस देखील कोविशिल्ड लशीचा घेणे आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांश लसीकरण केंद्रांवर या लसीचा पुरेसा पुरवठा होत नसल्याचे निदर्शनास आले आहे आहे ही गंभीर बाब आहे. याकडे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी ताबडतोब लक्ष द्यावे आणि कोविशिल्ड लसीचा पुरवठा सुरळीत करून नागरिकांना दिलासा द्यावा. अशी मागणी महाराष्ट्र राज्य काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव सचिन साठे यांनी आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्याकडे लेखी पत्रद्वारे केली आहे.
या पत्रात सचिन साठे यांनी पुढे म्हटले आहे की, दि.२६ जुलै ते ३१ जुलै २०२२ दरम्यान कोविडशिल्ड लसीचा पुरवठा प्रशासनाने  अल्प प्रमाणात केला आहे. तर दि. ३१ जुलै २०२२ पासून कोविडशिल्डचा पुरवठाच ठप्प आहे . त्यामुळे लसीकरण करू इच्छिणाऱ्या नागरीकांची निराशा होत असल्याचे दिसून येत आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन कोविडशिल्ड लसीचा पुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी या पत्रात सचिन साठे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.