मावळ,प्रतिनिधी : मावळ तालुक्यातील कोथुर्णे येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी पिडित मयत मुलीच्या घरी येऊन तीच्या आई वडिलांचे सांत्वन केले. यावेळी बोलताना विद्या चव्हाण म्हणाल्या, मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात अशी घटना घडली आहे. ही घटना अतिशय गंभीर असून या घटनेचा मी निषेध करते. जी महिला गावामध्ये अंगणवाडी सेविका म्हणून काम करते आणि तिचा या घटनेमध्ये सहभाग आहे, ही घटना काळीमा फासणारी आहे. आरोपी महिलेला व तिच्या मुलाला फासावर चढवा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी मोबाईल व सोशलमिडीया यावर काही निर्बंध आणले पाहिजे असे सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत महिला राज्य आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरघे यांच्या सह अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.