पिंपरी,प्रतिनिधि-पिंपरी चिंचवड शहराचा सन २०२१-२२ चा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ आणि पर्यावरण व अभियांत्रिकी विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्याकडे आज सादर केला. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, सहआयुक्त आशादेवी दुरगुडे, मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे, मुख्य लेखापरिक्षक प्रमोद भोसले, सहशहर अभियंता रामदास तांबे, श्रीकांत सवणे, संजय खाबडे, सतीश इंगळे, बाबासाहेब गलबले, ज्ञानेश्वर जुंधारे, वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उपआयुक्त विठ्ठल जोशी, अजय चारठाणकर, सुभाष इंगळे, रविकिरण घोडके, मनोज लोणकर, संदीप खोत यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.