Language: English Hindi Marathi

MISAHNA कडुन भारतात फॅशन लेबल लॉंच फॅशन शोमध्ये प्रदर्शित केले बेस्पोक कलेक्शन

पुणे, १ ऑगस्ट २०२२ :  MISAHNA मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन ने आज भारतात त्यांचे कार्य सुरू करण्याची घोषणा केली.  MISAHNA हे स्ट्रीटवेअर बेस फॅशन हाऊस आहे जे प्रीमियम फ्यूजन ऑफर करते .ब्रॅंड्ने भारतीय बाजारपेठेत आपल्या प्रवेशाची घोषणा केली आहे. ज्यासाठी नुकत्याच एका फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. या फॅशन शोमध्ये मॉडेल्सच्या रॅम्पवॉक द्वारे ब्रॅंडचे अनोखे डिझाइन्स आणि बेस्पोक कलेक्शन प्रदर्शित केले गेले, या फॅशन शोचे कोरियोग्राफर होते सॅम चर्चिल.
लंडन आणि टोरंटो येथे राहणार्‍या बहिणी मिसाहा जैन आणि सना जैन यांच्या संकल्पनेतुन MISAHNA   ब्रँडची सुरुवात झाली. कपडा उद्योजक कुटुंबातील ३ री पिढी म्हणुन सना आणि मिसाहा ने आपल्या पारिवारीक व्यवसायाला नव्या स्वरूपात सादर केले आहे. त्यांच्या आजी-आजोबांनी १९४० च्या दशकात त्यांचा स्वतःचा कपड्यांचा व्यवसाय सुरू केला होता, तथापि मिसाहा आणि सना यांना त्यांची स्वतःची ओळख आणि ब्रँड तयार करायचा होता,  MISAHNA    द्वारे त्यांनी स्ट्रीट वेअरचे स्वतःचे वर्जन तयार केले आणि कॅज्युअल कपड्यांमध्ये आधुनिक, भव्य, परंतु विस्तारीत दृष्टीकोन आणला.
लाँचच्या वेळी बोलताना मिसाहा आणि सना जैन म्हणाल्या, “ MISAHNA    सध्या स्टेटमेंट प्रिंट्स, मोठ्या साईजचे कपडे, अनोख्या हुडीज आणि खास स्वेटशर्ट्सवर लक्ष केंद्रित करत आहे. ग्राहकांच्या मूलभूत गरजांना अधिक आकर्षक रूप देण्यासाठी व रोजच्या स्टाईल्ससाठी आमच्याकडे आकर्षक टी-शर्ट आणि हुडीज आहोत. आम्हाला भारतीय बाजारपेठची चांगलीच समज आहे कारण आम्ही कपडे निर्मात्यांच्या कुटुंबातून आलो आहोत ज्यामुळे आम्ही खरेदीदारांची नाडी ओळखतो.  आम्ही आमच्या ग्राहकांसाठी आंतरराष्ट्रीय फॅशनमध्ये भारतीय मिश्रण घेऊन आलो आहोत, आम्ही नॅशनल-इंटरनॅशनल फॅशनचे अनोखे संमिश्रण निर्माण करत आहोत.
मिसाहा एक फॅशन स्टायलिस्ट आहे, तिने एफएडी इंटरनॅशनलमधून फॅशन स्टाइलिंगमध्ये डिप्लोमा पूर्ण केला आणि त्यानंतर लंडन कॉलेज ऑफ स्टाइल,

Leave a Reply

Your email address will not be published.