देहु:-पुण्याच्या चाकण MIDC हद्दीत जुगार खेळताना देहू संस्थानच्या विश्वस्तास रंगे हाथ अटक झाली, त्याच विश्वस्तावर आता देहू संस्थान हकालपट्टी करण्याच्या तयारीत आहे, अटकेतील विश्वस्त विशाल मोरेंना संस्थान बाजू मांडण्याची संधी देणार आहे. विशाल मोरे यांनी त्या संदर्भात खुलासा केला आणि ते दोषी नाहीत हे सिद्ध झालं नाही तर संस्थान च्या नियमानुसार त्यांची विश्वस्त पदावरून हकालपट्टी करण्यात येणार आहे अस संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी स्पष्ट केलंय, विश्वस्त विशाल मोरेसह माजी विश्वस्त संतोष गुलाब मोरे आणि देहूतील राष्ट्रवादी काँग्रेस चे नगरसेवक मयूर टिळेकर, नगरसेविकेचा पती विशाल परदेशी यांच्यासह 26 जण अटकेत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तीन पत्ती जुगार अड्ड्यावर छापा टाकल्यावर पर्दाफाश झाला आणि राजकिय वर्तुळासह वारकरी संप्रदायात एकच खळबळ उडाली, म्हणूनच संत तुकाराम महाराज संस्थान विश्वस्त विशाल मोरे यांच्याबद्दल कठोर पाऊल उचलताना दिसत आहेत.