
हिंजवडी ,प्रतिनिधी :-बनावट कॉल सेंटर बनवून त्याद्वारे नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.या टोळी ने वर्लपूल नावाच्या कंपनीच्या नावे खोटे कॉल सेंटर बनवले होते.त्या साठी या टोळीने एक टोलफ्री नंबर देखील तयार केला होता हा नंबर गुगल सर्च मध्ये संल्गन केला जेणे करून नागरिकांनी कंपनीच्या नावे सर्व्हिसची मागणी केली असता हाच नंबर सर्च इंजिन मध्ये दिसला जाईल.हिंजवडी मधील अरुण डुंबरे या व्यक्तीने आपला व्हर्लपूल कंपनीचा फ्रिज मध्ये बिघाड झाल्याने गुगलवर कंपनीचा नंबर सर्च केला असता त्यांना या कंपनीचा नंबर मिळाला त्या नंबरवर संपर्क साधला असता या टोळीतील दोघे जण यांच्या घरी आले व फ्रिज दुरुस्त केल्याचा बनाव करून त्यांच्या कडून कामाचे ३२५० रुपये घेतले परंतु त्यांना नंतर फ्रिजचे काम झाले नसल्याचे समजताच त्यांनी पुन्हा त्याच क्रमांकावर संपर्क साधला परंतु नंतर टाळाटाळ होत गेली अरुण यांनी नंतर दुसरा क्रमांक शोधत कंपनीशी संपर्क साधला असता कंपनी कडून आमचे असे कोणतेही सर्व्हिस सेंटर त्या भागात नसल्याचे सांगण्यात आले यानंतर अरुण यांना आपल्या सोबत फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसात धाव घेत या फेक कंपनी विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास करत पाच आरोपीना अटक केली .तपासा दरम्यान या सर्वानी मिळून हि कंपनी स्थापन केल्याचे काबुल केले पोलिसांनी या टोळी कडून एक लाख चौदाहजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या मध्ये टोलफ्री क्रमांकासाठी वापरात येणारे सात मोबाईलचा समावेश आहे.