……………
एकेकाळी ठाणे मुंबई येथे रिक्षा चालवणारे श्री. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाले.
एक रिक्षवाला राज्याचे नेतृत्व करण्यास सज्ज झाला असल्याने, सामान्य जनतेस तसेच रिक्षाचालकांमध्ये आनंदाचे,
उत्सहाचे वातावरण आहे.
……….
पिंपरी, ता. ९ : एकेकाळी ठाणे मुंबई येथे रिक्षा चालवणारे श्री. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाले.
एक रिक्षवाला राज्याचे नेतृत्व करण्यास सज्ज झाला असल्याने, सामान्य जनतेस तसेच रिक्षाचालकांमध्ये आनंदाचे,
उत्सहाचे वातावरण आहे.सामान्य कुटुंबात सातारा, महाबळेश्वर येथे अत्यंत दुर्गम भागात शेतकरी कुटुंबात जन्मलेले
श्री. शिंदे आपल्या कार्य कर्तृत्वाने मुखमंत्री पदा पर्यंत पोहचले आहेत. सर्वात जास्त आनंद रिक्षाचालकांना झाला
असून पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रिपब्लिकन वाहतूक आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजिज भाई
शेख यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांना लाडू वाटप करण्यात आले.रिक्षा चालकांसाठी सामाजिक सुरक्षा योजना
राबवावी वाहतूक व्यवस्थेची महत्त्वाची जबाबदारी पेलणाऱ्या रिक्षा चालकांना शासनाने सुरक्षा प्रदान करावी मंडळ
स्थापन करावे. मुख्यमंत्री महोदय यांच्यामार्फत शासनाकडे पाठपुरवठा करून रिक्षाचालकांना न्याय मिळेल अशी अपेक्षा
रिक्षाचालकांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.प्रदेशाध्यक्ष अजिज भाई शेख, प्रदेश सचिव बाळासाहेब भागवत पश्चिम
महाराष्ट्र सचिव राजन नायर, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अंकुश कानडी, शहराध्यक्ष स्वप्निल कांबळे भोसरी विधानसभा
रिक्षा आघाडी अध्यक्ष दत्तात्रय आढाव.यांच्या उपस्थितीत पिंपरी चौकात नागरिकांना लाडू वाटप करून आनंद उत्सव
साजरा करण्यात आला.नगरसेवक संदीप वाघेरे,माजी नगरसेवक राजेश पिल्ले पुणे जिल्हा संघटक क.घ. मुल्ला सर,
यांच्या उपस्थितीत लाडू वाटपाचा कार्यक्रम झाला.