Language: English Hindi Marathi

शिवसेना पक्ष पुन्हा उभारीला येणार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना विश्वास

Anc राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या अडीच वर्षात जे काम केले आहे ते काम अतिशय चांगले  असल्याचे शिवसेना खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी म्हणले असून राज्यांमध्ये जे काही वातावरण बिघडलेल आहे ते पाहता शिवसेना पक्ष हा पुन्हा उभारीला येईल असे वक्तव्य बारणे यांनी केलं आहे.
सध्या राज्यात वातावरण बिघडले असताना आता शिवसेना ऍक्टिव्ह मोड मध्ये झाली आहे.त्या पार्श्वभूमीवर मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड मध्ये बैठक आयोजित केली होती यावेळी  शिवसैनिक उपस्थित होते त्यांना  बारणे यांनी मार्गदर्शन केले..

यावेळी उपस्थित संपर्कप्रमुख वैभव थोरात माझी आमदार गौतम चाबुकस्वार शहर संघटिका उर्मिला काळभोर उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे चिंचवड विधान सभाप्रमुख आनंद कोराळे शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.