Language: English Hindi Marathi

विद्युत ऊर्जा वाहनांना प्रोत्साहन : ज्ञानेश्वर लांडगे

पिंपरी चिंचवड तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी
तयार केली इलेक्ट्रिकल ट्रायसीकल
पिंपरी, पुणे (दि.१ जुलै २०२२) वारंवार वाढणारे इंधन दर, इंधन आयातीसाठी होणारा खर्च आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचे होणारे अवमूल्यन रोखण्यासाठी पर्यायी इंधन म्हणून विद्युत ऊर्जेवर चालणाऱ्या वाहन प्रकल्पांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकार सह स्थानिक स्वराज्य संस्था देखील विद्युत वाहनांसाठी विशेष अनुदान योजना राबवीत आहेत. वेगाने विकसित होणाऱ्या या क्षेत्रांमध्ये अभियंत्यांना संशोधनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्या दृष्टीने पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) मधील सर्व शाखांमध्ये विद्यार्थ्यांना नेहमी संशोधनासाठी प्रोत्साहन देण्यात येते असे प्रतिपादन पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी केले.
पीसीईटीच्या पिंपरी चिंचवड तंत्र निकेतन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्प कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना ज्ञानेश्वर लांडगे बोलत होते.
  यावेळी पीसीईटीचे  उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आदीसह
प्राचार्य डॉ. विद्या ब्याकोड,  प्रा. एस. टी. बिऱ्हाडे, प्रा. पी. एल. देवताळे, प्रा. एस. एस. धानुरे,  अभियांत्रिकी शाखेतील अभिषेक गवळी, सुयश गवस, वैभव कानडे, दानेश बोरसे, सचिन मस्के, सागर सुतार, व्यंकटेश गिरी, शार्दुल पाटील हे विद्यार्थी आणि मार्गदर्शक प्रा. जी. के. राजे, प्रा. सी. वी. चीमोटे आदी उपस्थित होते.
पीसीपीच्या विद्यार्थ्यांनी
प्रदूषण विरहित तीनचाकी विद्युत वाहन बनविले आहे.
या तीनचाकी विद्युत वाहनामध्ये एक व्यक्ती आणि साहित्य बसू शकेल अशी व्यवस्था आहे. तसेच ही तीनचाकी व्यावसायिक दळणवळणासाठी सुद्धा वापरू शकतो. या सायकलसाठी १२ व्होल्टच्या ४ बॅटरी जोडल्या आहेत. आता ही सायकल ४ तास चार्ज केली की ५० कि. मी. पर्यत  १५० किलो वजन घेऊन जावू शकते अशी माहिती प्राचार्य डॉ. विद्या ब्याकोड यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.