पालघर – बोईसर पालघर मार्गावर रात्रीच्या वेळेस दरोडा टाकून सोन आणि पैसे लुटून पसार झालेल्या पाच आरोपींना पुणे तर दोन आरोपींना गुजरात येथून अटक करण्यात आली आहे . आठ जून रोजी रात्रीच्या सुमारास बोईसर वरून पालघर कडे येणाऱ्या सोने दुकानाच्या मालकाला लोखंडी रॉडने मारहाण करून आणि त्याच्या डोळ्यात मिर्ची पावडर टाकत या आरोपींनी गाडीच्या डिकीतील सोने आणि पैसे लंपास केले होते . यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून पालघर स्थानिक गुन्हे शाखेने सात जणांना अटक केली आहे . विशेष म्हणजे या गुन्ह्यातील दरोडे टाकणारे आरोपींपैकी पाच जण पुण्यात तर दोन जण गुजरात मध्ये पळून गेले होते . या सातही आरोपींच्या मुस्क्या पालघर पोलिसांनी आवळल्या असून याबाबत स्थानिक गुन्हे शाखेकडून अधिक तपास सुरू आहे.