Language: English Hindi Marathi

54 व्या बालगंधर्व रंगमंदिर महोत्सवात रंगला

पुणे : कलाकारांच्या मागे अनेक समस्या असतात. गैरसोय असते, सारखे दौरे असतात. मात्र त्यातही वेळात वेळ काढून आपण कलाकार मुलांना वेळ देता. त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देता हे कौतुकास्पद आहे, आशा शब्दांत अभिनेते माधव अभ्यंकर यांनी कलाकारांचे व त्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
बालगंधर्व रंगमंदिरच्या 54 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित महोत्सवात आज माधव अभ्यंकर आणि अर्जुन जाधव यांच्या हस्ते बालगंधर्व परिवारातील कलाकारांच्या पाल्यांचा 10 वी 12 उतीर्ण झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी बालगंधर्व परिवाराचे तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले,बाळासाहेब दाभेकर, निर्माते वैभव जोशी, बाळासाहेब आमराळे,डॉ गणेश चंदनशिवे आणि पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
यामध्ये 10 वी उतीर्ण झालेले निसर्ग निमकर, हर्षवर्धन भवार, वेदिका देशमुख, सिद्धी लोकरे, सायली शिंदे, आर्यन चतुर्वेदी, पूजा गवळी, श्रावणी कुंभार, वैष्णवी भाटे, ऋषिकेश नेठीथोर, संघर्ष संखद, स्नेहा चेन्नूर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तर आदित्य गवंडे, श्रावणी धोकटे, संमृद्धी चतुर्वेदी, कनिष्का करंबेळकर, सोनल साळवे, सुजल पिसे, गणेश सोनावणे, अनिष सुपेकर, आर्यन गायकवाड, अभिमन्यू जाधव, अभिषेक निकाळजे, स्नेहल डमरे या 12 वी उतीर्ण विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी स्नेहा दुधाळ (उस्मानाबाद) हिचा कुस्ती या खेळातील उत्तम कामगिरी बद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
माधव अभ्यंकर म्हणाले, कलाकारांच्या मागे अनेक समस्या असतात. गैरसोय असते, सारखे दौरे असतात. मात्र त्यातही वेळात वेळ काढून तुम्ही कलाकार मुलांना वेळ देता, हे महत्वाचे आहे.  त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देता हे अधिक कौतुकास्पद आहे.
यानंतर महोत्सवामध्ये पुण्यातील लोककलावंतांनी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा कार्यक्रम सादर केला.यावेळी बालगंधर्व परिवारातील लोककलावंतांचा बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रेश्मा /वर्षा परितेकर प्रस्तूत पारंपारीक लावणी नृत्य आविष्कार (जय अंबिका कला केंद्र, सणसवाडी),यावेळी बैठकीची लावणी ,खडी लावणी,छक्कड, बाले घाडी सादर करण्यात आली. तसेच अभिनेते विजय पटवर्धन आणि सहकाऱ्यांनी ‘हस्यनगरी’ हा कार्यक्रम सादर केला.

Leave a Reply

Your email address will not be published.