Language: English Hindi Marathi

सुमारे पाचशे किलो मसाला भात आणि लापशीचा हजारो वारकर्यांनी लाभ घेतला

दिघी, ता. 22 : संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळ्यातील वारकर्यांसाठी पहाटे चार ते सकाळी नऊ  पर्यंत अंघोळ तसेच चहा, नास्ता तसेच जेवणाचीही व्यावसथा करण्यात आली होती. सुमारे पाचशे किलो मसाला भात आणि लापशीचा हजारो  वारकर्यांनी लाभ घेतला.
आदर्श  मिञ मंडळाच्या वतीने
वारकर्यांच्याचे  आरोग्याचीही काळजी घेतली जात होती. त्यासाठी आरोग्य शिबीराचेही आयोजन करण्यात आले होते. तपासणी शिबीरात डाक्टरांनी सांगितलेंले  औषध-गोळ्यांचे वाटप करण्यात येत होते.   हजारो वारकर्यांनी या शिबीराचा लाभ घेतला. डॉ. महेश भारती, डॉ. अतुल तांबडे तसेच आदर्श मिञ मंडळाचे रविंद्र वाळके, कुलदिप वाळके,  संतोष खाडे, गणेश बनसोडे, बालाजी पाटील, सतिश वाळके, मयुर जगदाळे, सचिन यळवंडे, यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published.