Language: English Hindi Marathi

युवक काँग्रेसने मशाल मोर्चा काढून केला केंद्र सरकारचा निषेध

राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ चिंचवडमध्ये युवक काँग्रेसने काढला मशाल मोर्चा
चिंचवडगाव, ता. १९ : राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खासदार सोनिया गांधी आणि सरचिटणीस खासदार राहुल गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे. हा प्रकार म्हणजे काँग्रेसची आणि सोनिया गांधी व राहुल गांधी यांची बदनामी करण्याचा प्रकार आहे अशी टीका करीत पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने चापेकर चौकात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत मशाल मोर्चा काढण्यात आला. युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कौस्तुभ नवले यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मशाल मोर्चात महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व पिंपरी चिंचवडचे निरीक्षक अक्षय जैन, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, स्वप्निल बनसोडे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष रोहित शेळके, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, सरचिटणीस विनिता तिवारी, गौरव चौधरी, सौरभ शिंदे, वसीम शेख, विशाल कसबे, एनएसयूआय प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, रोहित तिकोने, जीफिन जॉन्सन, रोहित भाट, मयुर रोकडे, अथर्व माने, आशुतोष नार्वेकर, गणेश शितोळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.