चिंचवडगाव : आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या संकल्पनेतून व मा. शंकरशेठ पांडुरंग जगताप निवडणूक प्रमुख चिंचवड विधानसभा यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीच्या नात्याने नगरसेविका अश्विनीताई गजानन चिंचवडे – पाटील यांच्याकडून चिंचवड येथील सफाई कामगार बंधू – भगिनींना छत्री वाटप करून त्यांना सन्मानित करण्यात आले. त्या प्रसंगी मार्गदर्शिका विमलताई जोशी, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे कार्याध्यक्ष श्री महेश बारसवडे, संदीप दळवी, रोहित गावडे, योगेश वाल्हेकर, निलेश दळवी, हेमा कस्तुरे, स्वाती चौधरी, शिल्पा डोंगरे, संदीप माने आदी उपस्थित होते.