Language: English Hindi Marathi

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सुशिक्षित बेरोजगार नोंदणी अभियान.

पिंपरी, ता. १६ : पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवक अध्यक्ष इम्रान शेख यांनी अध्यक्षपदाची धुरा संभाळल्यानंतरची जी विधायक कामे केली त्या ५२ कामाची माहिती चित्रफिती द्वारे दिली. राष्ट्रवादीच्या वतीने युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे यांनी सांगितले.

यावेळी पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी देहूत झालेल्या शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना बोलू दिले नाही याबद्दल तीव्र शब्दात निषेध वेक्त केला. हा सोहळा भाजपा ने हॅकजॅक केला होता अजित दादा पवार यांना बोलू न देणे हा संपर्ण महाराष्ट्राचा आपमान आहे असे यावेळी अजित गव्हाणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख म्हणाले “केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अनेक मोठे मोठे कारखाने
उद्योग-व्यापार बंद पडले असून लाखोंच्या प्रमाणात तरुण नोकरीच्या शोधात गटांगळ्या खात आहे. बेरोजगारी वाढल्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. त्यांना रस्त्यावर यायची वेळ आली आहे. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड च्या वतीने दिनांक 18 जून ते 26 जून या कालावधीमध्ये संपूर्ण शहरात सुशिक्षित बेरोजगार नोंदणी अभियान राबवत आहोत.

पत्रकार परिषदेला प्रवक्ते माजी महापौर योगेश बहल, मा विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, मयुर कलाटे, कार्याध्यक्ष राहुल भोसले,चिंचवड विधानसभा अध्यक्ष विनोद नढे,युवक कार्याध्यक्ष योगेश गवळी, निलेश निकाळजे, आणि उपाध्यक्ष मझर खान, दिनेश पटेल, सतीश परब,राहुल पवार, तुषार ताम्हणे, दीपक गुप्ता व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.